संसद सुरक्षा भंग प्रकरणी आरोपी सागर शर्मा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. काल दिल्लीहून आलेल्या स्पेशल सेल टीमने सागरचं त्याच्या कुटुंबियांशी बोलणं करून दिलं. सागरने व्हिडीओ कॉलवर त्याच्या आईसोबत सुमारे ४० मिनिटे संवाद साधला. यावेळी त्याने आपण जे काही केलं ते योग्य असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीतील स्पेशल सेल टीमने सागरच्या खोलीतून काही कागदपत्रे जप्त केलीत. यामध्ये ४ बँक खात्यांचे पासबूक सापडलेत. या खात्यांमध्ये कधी पैसे आले कधी गेले अशा सर्व ट्रांजेक्शनबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. कुटुंबासोबत संवाद सुरू असताना सागरने यावर बातचीत केली.
पोलिसांनी सागरच्या वडिलांची स्वक्षरी घेतल्यानंतर डायरी, पुस्तके आणि काही फाइल्स जप्त केल्यात. तसेच आई-वडील यांच्यासह त्याच्या बहिणीची देखील चौकशी केलीये. याआधी यूपी एटीएसने सागरच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली, या मुद्द्यावर देखील सागरने आईशी संवाद साधला.
घुसखोरीबाबत बोलताना सागर काय म्हणाला?
सागर: आई, घरी सर्व ठीक आहे का, काही अडचण तर नाही ना?
आई: तू काय केलंस?
सागर: आई, मी जे केलं ते बरोबर आहे, ते योग्य आहे. मी कोणाच्या सांगण्यावरून असं केलेले नाही. चौकशीनंतर मला लवकरच सोडण्यात येईल.
सागर: आई, तुझी आणि माही(बहिण)ची काळजी घे. तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या. असं सागर यावेळी म्हणाला.