अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोमागील सत्य….

0
40

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या निरागस सौंदर्याने देशभरात सर्वांना वेड लावले आहे. साई पल्लवी मेकअपशिवाय देखील खूप सुंदर दिसते. सौंदर्याच्या बाबतीत तिने अनेक अभिनेत्रींना मत दिली आहे.

साई पल्लवी एक उत्तम अभिनेत्री आहेच त्याशिवाय उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिची फॅनची संख्या करोडोंमध्ये आहे. अनेकजण साई पल्लवीला त्यांची ड्रीम गर्ल मानतात. दरम्यान साई पल्लवीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोवरून असा दावा करण्यात येत आहे की, अभिनेत्रीने लग्न केले आहेत. खरंच असा आहे का? चला जाणून घेऊया.

साई पल्लवीच्या फॅन पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये एक तरुण साई पल्लवीच्या बाजूला दिसत. दोघांच्या गळ्यात वरमाळा दिसत आहे. दोघांना पाहून असे वाटत आहे की दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे.साई पल्लवीच्या व्हायरल फोटोमागील सत्य समोर आले आहे. साई पल्लवीच्या लग्नाचा फोटो दिग्दर्शक राजकुमार यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. दिग्दर्शकांनी सांगितले की, त्या फोटो असणार तरुण साई पल्लीवीचा सहकलाकार सिवाकार्थिकेयन आहे.

व्हायरल होत असलेला फोटो त्यांचा SK २१ या चित्रपटाच्या इव्हेंट लाँचमधील आहे. पूजेदरम्यान साई पल्लवीच्या गळयात हा हार घालण्यात आला आहे.

दिग्दर्शक राजकुमार यांच्या एक्सवरील पोस्टने स्पष्ट झाले आहे की साई पल्लवीचा व्हायरल होत असलेला फोटो तिच्या लग्नातील नाही. तर चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये काढलेले तो फोटो आहे. दक्षिणेत कोणताही चित्रपट लाँच झाला की असे हार घालतात. साई पल्लवीच्या चाहत्यांसाठी खास, सई पल्लवी अजूनही अविवाहित आहे आणि तिचे लग्न झालेले नाही. चुकीचे कॅप्शन टाकून फोटो व्हायरल केला जात आहे.