अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये ती अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सईचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती पापराझींना मकर संक्रातीच्या शुभेच्छा देत तिळाचे लाडू वाटताना दिसत आहे. याचदरम्यान ती बाजूला असलेल्या गायीला देखील तिळाचा लाडू भरवताना पाहायला मिळत आहे. सईचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सई ताम्हणकर कॉलेजच्या मुलींसोबत धम्माल डान्स करताना दिसत आहे. सईने कॉलेज कुमारींसोबत ठेका धरला असून ती बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे. https://www.instagram.com/reel/C2HOE_ZoiB-/?utm_source=ig_web_copy_link