गेल्या काही दिवसांपूर्वी ‘आमचे पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर प्रचंड रिल्स व्हायरल झाले होते. या गाण्यावरील साईराज केंद्रेचा रिल इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्याला फार मोठी प्रसिद्धी मिळाली. आता रिलस्टार साईराज केंद्रे टीव्ही सिरीयलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात आलेला साईराज केंद्रे आता छोट्या पडद्यावर एंट्री घेणार आहे. झी मराठीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या लोकप्रिय मालिकेमध्ये तो झळकणार आहे. ज्याचा प्रोमो समोर आला आहे. मालिकेमध्ये, साईराजने अप्पी आणि अर्जुनच्या मुलाचे पात्र साकारले आहे. येत्या १ मे पासून मालिकेमध्ये, ७ वर्षांचा लीप येणार आहे. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यातील पुढील प्रवास पाहायला मिळणार आहे. नुकतंच झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, अप्पी आणि अर्जुनचा मुलगा मोठा झालेला दिसत आहे. अप्पी आणि अर्जुनच्या मुलाचे पात्र साईराजने साकारले
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रेची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, टीझर रिलीज
- Advertisement -