छत्रपती संभाजीनगर : अग्निशामक विभागातील मुख्य अधिकाऱ्याने ना हरकत प्रमाणपत्रासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. यात चौकशी केली असता दोषी आढळून आल्याने मुख्य अग्निशनम अधिकाऱ्यांसह विभागातील लिपिकावर महापालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अग्निशमन विभागात साधारण महिनाभरापूर्वी अर्थात पस्तीस दिवसापूर्वीच प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून नेमलेल्या संपत भगत आणि लिपिक एम. बी. नरके यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दीड लाख रुपये घेतले होते. रक्कम घेतल्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने संभाजीनगर महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दोघांवर निलंबनाची कारवाई केली. यामुळे महापालिका प्रशासनानात खळबळ उडाली आहे.
संभाजीनगर शहरातील एका व्यवसायिकाने एनओसीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी मुख्य अधिकारी आणि लिपिक यांनी दीड लाखाची मागणी केली होती. ठरल्यानुसार व्यावसायिकाकडून दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारली होती. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर दोघांनी लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी तडका फडकी निलंबनाची कार्यवाही केली