महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी मान्य केली. याबाबत बोलताना ज्याला भिऊ नाही त्यांनी कशाला भ्यायला पाहिजे, अशी पहिली प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. मराठा बांधवांना सांगतो मी हे आधीच सांगितलेलं, आपली एक परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत, मला गुंतवण्यासाठी तसे लोकं यांनी तयार केलेलेत आणि मुंबईत नेऊन बसवले आहेत, हे मी आधीच सांगितलं होतं, असं मनोज जरांगे म्हणाले. तू इकडं काय षडयंत्र करतो, मीच तुझ्या घरी येतो, चल हे सांगितलेलं आहे. हे मला गुंतवणारच होते. कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात आरक्षणासाठी गेलाय. स्वतःच्या लेकरासाठी तुला मोठं करायसाठी आम्ही पंधरा वीस वर्षे घातली आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करुन मला गुंतविणारे ते मी आधीच सांगितलं. मी भीतच नाही, चौकशीला जायला सामोरं जायला तयार आहे. काय करायचं ते करा , मी या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलं. आमच्या आई बहिणीला हाणता त्या टायमाला तुम्ही हसतं होता का? गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला लागलं आता स्वतःवर आल्यावर? असं मनोज जरांगे म्हणाले.