Saturday, December 9, 2023

बीडमधील हिंसाचारात भुजबळांचे नातेवाईक, त्यांनीच हॉटेलची तोडफोड केली

मराठा आरक्षणा आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. यावेळी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेलला आग लावण्यात आली. मात्र, ही आग मंत्री छगन भुजबळ यांच्या नातेवाईकांनीच लावल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषेदत ते बोलत होते. जरांगे म्हणाले की, “जाणीवपूर्वक षड्यंत्र सुरु असून, गोरगरिबांचे मुलं पोलिसांच्या खोट्या केसमध्ये अडकवले जात आहे. बीड येथील भुजबळ यांच्या पाहुण्याचे हॉटेल फोडण्यात आले. मात्र, ते हॉटेल त्यांच्याच पाहुण्यांनी फोडले असल्याची खात्रीलायक माहिती मला मिळाली आहे. मराठा समाजातील मुलं अशी तोडफोड करणार नाही. मात्र, मराठा समाजातील मुलं खचली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जरांगे म्हणाले आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d