Saturday, January 25, 2025

एकनाथ शिंदेंना धक्का ? महापालिका निवडणुक भाजपकडून स्वबळाची तयारी

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती न करता स्वतंत्र निवडणूक लढावी; असा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा असल्याने भाजपकडून महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले आहे.

मुंबईत काल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार चंद्रशेखर गरजे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत शहरातील माजी नगरसेवक कैलास गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढावं असा आग्रह केला.

शिवाय मुंबईतील प्रदेश कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये ज्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्या शिवसेनेला बाजूला सारून भाजप आपला एकहाती झेंडा घेण्याची तयारी सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार असे शिंदेसेनेचे नेते सांगत असले, तरी शिंदेसेनेशी युती करण्यापेक्षा स्वतंत्र लढावं असा आग्रह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत शहरातील माजी नगरसेवक कैलास गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढावं असा आग्रह केल्याचे सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles