Tuesday, February 27, 2024

समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यात धोत्रे शिवारात अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; दोन जण जखमी

मागील काही दिवसांपासून अपघातांच्या मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडला असून, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर एक कंटेनर नादुरुस्त असल्याने उभा होता. दरम्यान, शिर्डीकडे भरधाव जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरचालकाला धडकल्यानंतर कंटेनरवर दूर जाऊन आदळली. ज्यात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी आहेत. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे मृत व्यक्तींचे नावं आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रात्री 11 च्या सुमारास कारचा अपघात झाल्याची घटना घडलीय. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी पोहचत जखमींना वैजापूर येथे उपचारासाठी दाखल केले. अपघातात MH 21 BF 9248 या क्रमांकाच्या कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय. मृत राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी असून, ते शिर्डीकडे निघाले होते. अपघातात फलके व वाघ हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.
धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एक कंटेनर नादुरुस्त असल्याने उभा होता. जालन्याहन शिर्डीकडे भरधाव जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरचालकाला धडकल्यानंतर कंटेनरवर जाऊन आदळली. ज्य्ता तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहेत. तर, तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles