Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनवर पहिल्यांदाच 7000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. एखादा प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर या डीलचा फायदा घेऊ शकता.
कंपनीच्या वेबसाईटवर हा फोन बंपर डिस्काउंट आणि ऑफरसह उपलब्ध झाला आहे. फोनचा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 54,999 रुपये आणि 256 जीबी मॉडेल 58,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. हे दोन स्मार्टफोन 7 हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह विकत घेता येईल. यासाठी फक्त तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट करावं लागेल. तसेच तुम्ही तुमचा जुना मोबाईल एक्सचेंज करून 37,400 रुपयांपर्यंतची बचत देखील करू शकता.