Samsung Galaxy S24 FE ग्राहक गॅलॅक्सी एस २४ एफई स्मार्टफोन अनेक दिवस चर्चेत राहिला. हा स्मार्टफोन ३ ऑक्टोबरपासून सर्वत्र उपलब्ध होईल. आता या स्मार्टफोनची प्री-बुकिंगसुद्धा सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. सॅमसंगचा ८ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंट किंमत ५९,९९९ रुपये आहे, तर ८ जीबी रॅम + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ६५,९९९ रुपये आहे. तसेच यामध्ये ब्ल्यू, ग्रेफाइट आणि मिंट आदी रंग पर्याय आहेत.ग्राहक सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर सॅमसंग गॅलॅक्सी एस २४ एफई प्री-बुक करू शकतात. सॅमसंगने सांगितले की, जे ग्राहक गॅलॅक्सी एस २४ एफईचे ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट प्री-बुक करतात, ते हा स्मार्टफोन ५९,००० रुपयांपर्यंत खरेदी करू शकतात; ज्याची मूळ किंमत ६५,९९९ रुपये आहे. या व्यतिरिक्त ग्राहक ९९९ रुपयांच्या सवलतीच्या किमतीत सॅमसंग केअर प्लस पॅकेजचा लाभ घेऊ शकतात AI अनुभवासाठी Exynos 2400e चिप वापरली जाते, जी Galaxy S24 फ्लॅगशिप स्मार्टफोनलाही पॉवर देते. गॅलॅक्सी स्मार्टफोनमध्ये काही AI-आधारित फीचर्स आहेत.
- Advertisement -