विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात होते. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर मैदानात होते. मिलिंद नार्वेकरांनी दुसऱ्या पसंतीची दोन मते घेत विजय मिळवला. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांचा विजय हा स्वताच्या बळावर झाला आहे. याचे श्रेय हे कोणीही घेऊ नये. मिलिंद नार्वेकर यांना तिकीटच त्याच्यासाठी दिले होते. त्यांचे सर्वांसोबतचे रिलेशन आहे. यात उद्धव ठाकरे यांची कोणतीही रणनीती नाही. असंही ते म्हणाले आहेत. सर्व पक्षांनी मिळून या निवडणुकीत शरद पवारांचा करेंक्ट कार्यक्रम केला अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आहेत. आतापर्यंत त्यांनी पडद्यामागे राहून काम केले होते. पण ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे.