Monday, July 22, 2024

संदेश कार्ले पारनेर विधानसभेच्या आखाड्यात ! पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

संदेश कार्ले विधानसभेच्या आखाड्यात
नगर तालुका पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून नगर तालुक्यात संदेश कार्ले यांनी भरीव कामे केली आहेत. तसेच तोट्यात असलेली घोसपुरी पाणी पुरवठा योजना नफ्यात आणून राज्यात आदर्श निर्माण करुन नाव लौकिक मिळविला आहे. गेल्या तीन टर्म विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. आता आगामी तीन महिन्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीत संदेश कार्ले हे विधानसभा निवडणूक लढविणारच असल्याचे संकेत त्यांच्या निकटवर्तीयांकडून दिले जात आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनीच संदेश कार्ले यांच्याबद्दल विचारणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्ले यांनी तयारी चालविली असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेटही घेतली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. गत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्योजक माधवराव लामखडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी नशीब आजमावले आहे. आता संदेश कार्ले नशीब आजमावरणार असल्याचे सांगितले जात आहे. पारनेर मतदारसंघात पारनेर तालुक्यातील दोन-तीन उमेदवार रिंगणात उतरल्यास व नगर तालुक्यातून संदेश कार्ले रिंगणात उतरल्यास वेगळा निकालही लागू शकतो असाही अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles