मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर सर्व राजकीय पक्षाने मोर्चा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे वळवला आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. याचदरम्यान ठाकरे गटाने नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाने शिक्षक मतदारसंघातून संदीप गुळवे यांनी उमेदवारी दिली आहे. गुळवे यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश करताच त्यांना उमेदवारी मिळाली.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे. आज शनिवारी ठाकरे गटाने नाशिक शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाने या मतदारसंघातून संदिप गुळवे यांना उमेदवारी दिली. संजय राऊतांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी मिळाली.