काँग्रेसचे राष्ट्राय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार राहुल गांधी हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
आमचं सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी तुम्हाला 2 हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का, मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपच सरकार जाईल, असेही खर्गे यांनी म्हटले. यावेळी, राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेतील पात्र महिलांना 2000 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलंय.