सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक पी. आर. पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांच्या अगोदर ही ऑफर होती असा दावा पी. आर. पाटील यांनी केला. जयंत पाटील यांना अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याच्या एक वर्ष अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर होती, असा दावा पी. आर पाटील यांनी केला. फडणवीस यांच्या ऑफरवर जयंत पाटील यांनी आमच्याशी चर्चा केल्याचं देखील ते म्हणाले.
भाजपची पहिली पसंती जयंत पाटील….अजितदादांआधी दिली होती उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर
- Advertisement -