उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? असा सवाल करत उध्दव ठाकरे यांच्या पंतप्रधानपदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केले. राऊत यांनी सांगलीमध्ये बोलताना शरद पवार यांचाही पाठिंबा मिळेल, असा दावा केला. ते म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्या पंतप्रधानपदाचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल. पंतप्रधानपदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली, तर शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व नेते पाठिंबा देतील. पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राला का मान मिळू नये? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होतील याची वाट बघत होतो. मात्र, अंतर्गत वादामुळे हे शक्य झालं नाही असेही संजय राऊत म्हणाले.