सांगली: भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचं नेतृत्व हे योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं असं मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं. सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुस्लिमांना त्यांच्या हक्काची अनेक राष्ट्रं आहेत. हिंदू धर्मासाठी भारत हा एकच देश आहे. इथून हाकललं तर आसरा घ्यायला आपल्याला दुसरं राष्ट्र नाही. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं असं मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं.
2027-2028 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेतून पायउतार व्हावं आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडे देशाची सत्ता सोपवावी. ‘सब का साथ, सब का विकास’ यामुळे आता मळमळायला लागलं आहे असं शरद पोंक्षे म्हणाले.