Friday, December 1, 2023

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला निघालेल्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा भीषण अपघात….एकाचा मृत्यु

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने आझाद मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी भव्य दिव्य व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानात शेवटच्या शिवसैनिकाला एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकता यावेत यासाठी सहा मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. तिकडे सांगलीच्या शिवसैनिकांचा मोठा अपघात झाला. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळी ही घटना घडली.

एक भरधाव ट्रकने शिवसैनिकांच्या गाडीला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: