Tuesday, June 25, 2024

Ahmednagar crime :मुलगी देण्यास नकार दिल्‍याने मौलानाने केला वडिलांचा खून; दोघांना अटक

संगमनेर – लग्नासाठी मौलानाने मुलीला मागणी घातली, परंतु मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी नकार दिल्याने चिडलेल्या मौलानाने साथीदारांच्या मतदीने पूर्वनियोजित कट रचून वडिलांचा गळा आवळत खून केल्याचे अखेर उघड झाले. संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत थेट उत्तर प्रदेशमधून मौलानासह दोघांच्या मुसक्या आवळत गजाआड केले.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की उत्तर प्रदेशातील मौलाना मोहम्मद जाहीद मोहम्मद युनूस मुलतानी (रा. साहरनपूर, उत्तर प्रदेश) याने आहतेशाम इलियास अन्सारी (रा. मदिनानगर, संगमनेर) यांच्या मुलीला लग्नाची मागणी घातली. परंतु, यास त्यांच्यासह नातेवाईकांनी नकार दिला. याचा राग आल्याने मौलाना मुलतानी याने मुलीचे वडील अन्सारी यांना दमदाटी करून ‌तुमने ऐसे तरीके से लडकी नही दी तो मुझे दुसरा तरीका भी आता है, मै तुमको बरबाद कर डालूंगा… अशी धमकी दिली.

त्यानंतर साथीदार मोहम्मद इम्रान निसार सिद्दीकी (रा. कल्याण) व मोहम्मद फैजान शमीम अन्सारी (रा. बगदादा, ता. धामपूर, जि. बिजनौर) यांच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचला. त्यानुसार ३ एप्रिल, २०२४ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मालदाड गावच्या पुढील वनामध्ये दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. तेथून पुरावा नष्ट व्हावा म्हणून मयताचा मोबाइल फोन घेऊन गेले.

याप्रकरणी सुरुवातीला शहर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सखोल तपासाच्या सूचना दिल्या असता खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशमधून मौलानासह दोघा साथीदारांच्या मुसक्या आवळत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles