Tuesday, April 23, 2024

संगमनेरच्या प्रसिद्ध वडापाववाल्या चाचांचे भाकीत ,खासदार लोखंडेना दिल्या अनोख्या

खासदार लोखंडे यांनी अन्सार चाचांचा हात हातात घेत त्यांचा फेमस डायलॉग ..”खाता की नेता” म्हणताच उपस्थितांसह अन्सार चाचा देखील खळखळून हसले. ते उत्तरात म्हणाले… “पहिले खाता अन् मग नेता” नेत्या समोर खाता आणि नेता असे यमक योगायोगाने जुळल्याने अन्सार चाचांना हसू आवरले नाही. त्यानंतर चाचांनी सदाशिव लोखंडे यांच्या सह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. चाचांनी स्वतः आपल्या हाताने खासदारांना वडापाव देखील खाऊ घातला.

शिर्डी लोकसभेचे महायुतीची उमेदवार सदाशिव लोखंडे संगमनेर तालुका दौऱ्यावर आहे. संगमनेरला गेल्यावर प्रसिद्ध अन्सार चाचा यांच्या वडापावच्या दुकानात वडा खान्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. यावेळी चाचांनी नेहमीच्या आपल्या शैलीने त्यांचे स्वागत केले. त्यांचा प्रसिद्ध डॉयलॉग “खाता की नेता” हा वापरला. तसेच आमच्याकडे वडा खाणारा निवडूनच येणार? अशा अनोख्या शुभेच्छाही दिल्या.

यावेळी अन्सार चाचांनी आपली प्रतिक्रिया देताना पुन्हा नवीन डायलॉगला जन्म देत म्हणाले “आमच्याकडे जे वडे खाता,ते 100 टक्के निवडूनच येता” असे म्हणत खासदार साहेब आज माझ्या दुकानात आले आणि त्यांनी वडापाव सुद्धा खाल्ला मला फार आनंद झाल्याचे सांगत त्यांनी विजयासाठी खासदार लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles