Monday, June 23, 2025

विखे पाटील म्हणाले…. बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेशाची इच्छा पण..

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काल संगमनेर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंसह, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केलीयं.

विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात यांना एवढं गंभीर घेण्याची गरज नाही. थोरात सध्या दिवसा मातोश्री, संध्याकाळी सिल्वर ओकवर आणि रात्री भाजपच्या लोकांसोबत असतात, अशी सध्या त्यांची अवस्था आहे. त्यामुळे थोरात यांना कोणी गांभीर्याने घेत नाहीत. मुळात बाळासाहेब थोरात यांची भाजपात येण्याची इच्छा होती पण भाजपमध्ये त्यांना कोणी घेत नाहीत, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलायं.
बाळासाहेब थोरात भाजपात आले तर स्वागतच आहे, त्यांचे आजच भाजपासोबत आतून संबंध प्रस्थापित झाले आहेत फक्त औपचारिकता बाकी असल्याचं विखेंनी स्पष्ट केलंय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles