मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढलं. दंगल का घडली? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे असाही दावा संगीता वानखेडेंनी केला. संगीता वानखेडे या मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलनात कार्यरत होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर फारकत घेतल्यानंतर संगीता वानखेडेंनी त्यांच्यावर टीका केली आहे आणि आरोप केले आहेत.
बारसकर महाराज यांनी जे सांगितलं तेच बरोबर आहे. मनोज जरांगे पाटील कुणालाच विश्वासात घेत नव्हते. एक फोन यायाचा आणि ते पुढची दिशा सांगायचे. तो फोन शरद पवारांचाच असणार दुसरं कोण असणार? शरद पवार त्यांच्यामागे आहेत. आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे. कालांतराने हे सत्य बाहेर येईल असंही संगीता वानखेडे यांनी म्हटलं आहे. माझं तोंड कुणी बंद करु शकणार नाही. बारसकर यांच्याकडे पुरावा आहे. जरांगे काल काय म्हणाले? हे तर एक-दोनच आहेत. अजून बाहेर येतील असं म्हणाले होते. लोक आता बाहेर येतील. यांची मतं पटलेली नाही आणि लोक फुटलेत. त्यामुळे लोक बाहेर येणार आहेत असंही वानखेडे म्हणाल्या.