Saturday, January 25, 2025

विवाहित असताना केलं दुसरं लग्न, नवरीने नवरदेवाला चुना लावला; लाखो लुबाडले

धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिलं लग्न झालेलं असताना एका महिलेने चौघांच्या मदतीने दुसरं लग्न केलं आणि नवरदेवाला तब्बल दीड लाख रुपयांचा गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिले लग्न झालेले असताना एका विवाहितेने अन्य चौघांच्या मदतीने नवरदेवाला दीड लाख रुपयांना गंडा घातला. याबाबत ५ जणांविरोधात सांगलीच्या संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कृष्णा सुभाष जाधव यांनी फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी पल्लवी मंदार कदम, परवीन मोदीन मुजावर, एजंट – राणी कुंभार, राधिका लोंढे आणि सुमन वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

फिर्यादी कृष्णा जाधव हे खासगी नोकरी करतात. अटक करण्यात आलेल्या ५ जणांनी संगनमत करुन परवीन मुजावर हिचे लग्न झालेले असताना देखील फिर्यादी कृष्णा समवेत तिचे दुसरे लग्न लावून दिले. याकरिता फिर्यादीकडून दीड लाख रुपये घेतले. ही बाब काही दिवसांनी फिर्यादी कृष्णा जाधव यांना समजली.

वास्तविक संशयित पल्लवी उर्फ परवीनचे पहिले लग्न मंदार कदम याच्यासोबत झाले होते. मात्र ही बाब संशयितांनी फिर्यादी कृष्णा जाधव यांच्यापासून लपवून ठेवली. परवीन ही मुस्लिम धर्माची असून देखील पल्लवी कदम या नावाने तिन स्वत:ची ओळख सांगितली आणि कृष्णा जाधव यांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पल्लवी कदम आणि एजंट राणी कुंभार यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. अधिक तपास संजयनगर पोलिस करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles