Tuesday, April 29, 2025

मोठा भाऊ उपसरपंच झाला; आनंदात पठ्ठ्यानं केलं असं काही की, संपूर्ण गावात होतेय चर्चा

आपला भाऊ गावच्या उपसरपंच पदावर विराजमान झाला आणि आपल्या कुटुंबाचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले. म्हणून उपसरपंचाच्या छोट्या भावाने गावाला आणि गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालत आपला आनंद व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील भावावरचे हे बंधुप्रेम चर्चेत आले आहे.
अंकुश खिलारे असे हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचे नाव आहे. तर साहेबराव खिलारे असे उपसरपंच झालेल्या भावाचे नाव आहे. अंकुश हे गलाई व्यावसायिक असून ते व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात असतात. त्यामुळे गावातील शेती-कुटूंबाची जबाबदारी त्यांचे जेष्ठ बंधू साहेबराव खिलारे यांच्यावर सोपविण्यात आली.
भाऊ शेती सांभाळत सांभाळत आज गावचा उपसरपंच झाल्याचे सेलिब्रेशन मात्र या भावाने मोठया थाटामाटात केलय. यामुळे सर्वचजण अचंबित झालेत. गावावर तब्बल 3 ते 4 तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्यात आल्या. खिलारे कुटुंबातील कोणी ना कोणी गावचा सरपंच, उपसरपंच व्हावा ही या कुटुंबाची खूप वर्षांपासून इच्छा होती.

20 वर्षांपूर्वी दुर्योधन खिलारे यांच्या रूपात ही संधी थोडक्यात हुकली होती. मात्र यंदा गावच्या उपसरपंच पदावर साहेबराव खिलारे यांची निवड झाली आणि खिलारे कुटूंबाचे स्वप्न पूर्ण झाले. एक स्वप्न पूर्ण झाले म्हणून साहेबराव खिलारे यांचे छोटे बंधू अंकुश खिलारे यांनी गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घालण्याची इच्छा लाखो रुपये खर्च करून पूर्ण केली.कोणती व्यक्ती आपला आनंद कसा व्यक्त करेल याचा काही नेम नाही. काही जणांना जास्त आनंद झाल्यावर थेट डोळे पाण्याने भरून येतात. तर काही व्यक्ती आपल्या आनंदात दानधर्म करतात. अशात सागंलीमधील या भावाने थेट आनंदात गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालतली आहे. त्यामुळे सांगलीसह संपूर्ण राज्यात याबाबत चर्चा सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles