लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. शहाजी पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश कणार आहेत. आज पुण्यामध्ये संग्रामसिंह पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे पुतणे संग्राम पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. संग्रामसिंह पाटील हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तसेच काही दिवसात स्वतः शहाजी बापू पाटीलही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील, असे मोठे विधानही संग्राम पाटील यांनी केले आहे.
शरद पवार यांनी सांगोल्यात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊ असे सांगितले आहे. त्यानुसार पक्ष प्रवेशाचे नियोजन ठरवले जात आहे. शरद पवारांकडे पूर्ण काका ग्रुपचं येणार आहे. ९ पुतणे येतील आणि त्यानंतर हळू हळू काका पण पाठीमागे येतील. झाडी डोंगर बघून झालं. त्यांचं वास्तवाचे भान त्यांना आता आलंय, ते परतीच्या प्रवासाला लागतील, असे म्हणत गुवाहाटीला जाऊन मतदान मिळत नाही, काकाही येतील त्यांच्याकडे पर्याय नाही,” असा टोलाही संग्रामसिंह पाटील यांनी लगावला आहे.
आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का! जवळच्या ९ व्यक्ती शरद पवार गटात प्रवेश करणार…
- Advertisement -