अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय लंके
नगर – अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय भागुजी लंके यांची तर सचिवपदी आनंदराव सीताराम पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघटनेचे द्वैवार्षिक अधिवेशन अहिल्यानगर शहरात झाले त्यावेळी ही निवड करण्यात आली.
या अधिवेशनासाठी संघटनेचे सर्कल बापू अहिरे, पुणे विभागीय सचिव एन.बी.जाधव, अहिल्यानगर पोस्टल सोसायटीचे चेअरमन रामेश्वर ढाकणे, सचिव विजय चाबुकस्वार, अमोल साबळे, श्री.नागपुरे, श्री. डोंगरे, श्री. येवले, श्री. लबडे, प्रफुल्ल काळे, राजेंद्र गवते, प्रमोद कदम, सलीम शेख, सुर्यकांत श्रीमंदिलकर, विजय एरंडे, संजय परभणे, सिद्धेश्वर घोडके, भीमराज गिरमकर, किरण मुरुमकर, श्री.जाधव, श्रीकांत ढगे, दीपक शिंदे, गणेश इंगळे यांच्या सह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
या अधिवेशनात संघटनेच्या जिल्हा पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यावेळी खा. निलेश लंके यांनी या अधिवेशनात उपस्थिती लावून नूतन जिल्हाध्यक्ष संजय लंके व सचिव आनंदराव पवार यांचा सत्कार केला. तसेच ग्रामीण डाक सेवकांच्या समस्या, विविध प्रलंबित प्रश्न संसदेच्या अधिवेशनात मांडून सोडविण्याचा प्रयत्न करू, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटून त्यांच्या कडूनही डाकसेवकांचे प्रश्न सोडवून घेवू अशी ग्वाही दिली.
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय लंके
- Advertisement -