राऊत यांच्या अटकेनंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एकच वाक्य लिहिलं आहे. ते म्हणजे खाकस्पर्श… या हेडिंग खाली तीन फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत. या तिन्ही फोटोत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कॉमन आहेत. पहिल्या फोटोत पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हात पकडलेला आहे. देशमुख हे सध्या मनी लॉन्ड्रिग प्रकरणात तुरुंगात आहेत. दुसऱ्या फोटोतही पवार आहेत. या फोटोत पवारांनी माजी मंत्री नवाब मलिक यांचा हात पकडला आहे. मलिकही तुरुंगात आहेत. त्यांच्यावरही मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. तिसऱ्या फोटोत पवारांनी संजय राऊत यांचा हात पकडला आहे. राऊतांनाही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे फोटो पोस्ट करून अतुल भातखळकर यांनी काहीही न बोलता राजकीय भाष्य केलं आहे. तिन्ही फोटोतील नेते तुरुंगात आहेत. तिघांचेही हात पवारांनी पकडले आहेत. आणि या फोटोंना खाकस्पर्श देण्यात आलं आहे. म्हणजे पवारांनी ज्यांचा हात पकडला तो खाक झाला






