मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी बिनशर्त भाजप पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी महायुतीसाठी सभा देखील घेतल्या होत्या. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून मतदानादरम्यान संजय राऊतांनी टोला लगावला आहे. ‘राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर पक्षातील कार्यकर्त्याला चांगले दिवस आले असते, असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे भाजपसाठी फिरत आहे. सभा घेत आहेत. परंतु राज ठाकरे यांच्यासह अनेकांना भाजपने भाड्याने घेतले आहे. राज ठाकरे ज्या मोदी आणि शाह यांचे कौतूक करत आहेत, त्यांनी काय महान दिवे लावले आहेत. कधी मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका, असे राज ठाकरे म्हणत होते. परंतु आता ते चोरीच्या मालाचे समर्थन करत आहेत.