ऐन लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. एका विश्वासू कार्यकर्त्यानं अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी शड्डू ठोकला आहे. तसेच, मावळचं मैदान मारणार, असं म्हणत रणशिंगही फुंकलं आहे. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय माजी महापौर संजोग वाघेरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मातोश्री येथे वाघेरेंचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला मावळमध्ये प्रचाराला यायची गरजच नाही, आजच मावळमध्ये भगवा फडकला.
संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक राहिलेत
महापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिलाय
त्यांच्या पत्नी ही नगरसेविका होत्या
स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले आहे
संजोग वाघेरे राष्ट्रवादी चे सलग 8 वर्षे शहराध्यक्ष राहिलेत
शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं