पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये विश्वचषकाचा रोमांचक सामना पार पडला. क्रिकेट सामना पाहण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरही स्टेडियममध्ये उपस्थित होती. भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. सामन्यादरम्यान, बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना शुबमन गिल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी प्रेक्षकांनी शुबमन गिलकडे पाहून सारा तेंडुलकरच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो” अशा घोषणा प्रेक्षकांनी दिल्या. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शुबमन गिल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. तर शेकडो प्रेक्षक सारा तेंडुलकरच्या नावाने घोषणा देत आहेत.
- Advertisement -