नगर : नगर शहराने नाट्य व चित्रपट सृष्टीला अनेक महान कलाकार दिले आहे, आता युवा पिढीही त्यांचा आदर्श घेत फिल्म सिटीत आपले पदार्पण करत असून एक वेगळा ठसा उमटवत आहे. नगर येथील आय एम एस कॉलेजचे प्राचार्य मेहेरनोश मेहता यांची कन्या अर्शिन मेहता हिने तेलगु भाषेतील सर्कल चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे, तेलगु भाषेतील सर्कल चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. अर्शिन मेहता हिने चित्रपट सृष्टीत चांगली कामगिरी करत अहमदनगर शहराचे नाव उंचावले आहे, अर्शिन मेहता हिने आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण अहमदनगर मध्ये केले त्यानंतर पुण्यात सीए ची पदवी प्राप्त केली, मात्र तिला कला क्षेत्राची जास्त आवड असल्याने तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण करत तिथे उत्तम कामगिरी केली, अहमदनगरच्या कन्येने तेलगु भाषेतील चित्रपटात मुख्य भूमिका साकारली ही नगरसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.
- Advertisement -
Congrats . Mahernosh ji and aarshin