Saturday, April 26, 2025

कोणतीही ग्रामपंचायत बंद नाही…बोगस संघटनेकडून बंदचा नारा..सरपंच परिषदेचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- राज्यभरातील ग्रामपंचायत 18 डिसेंबर पासून दोन दिवस बंद असल्याचा दावा करुन चुकीच्या बातम्या प्रसारित करणाऱ्या बोगस संघटनेशी सरपंच परिषदेचा कुठलाही संबध नसल्याचा खुलासा सरपंच परिषदेचे राज्य राज्य कोअर कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केला आहे. तर राज्यातील कुठलीच ग्रामपंचायत बंद राहणार नसल्याचे म्हंटले आहे.
नोंदणी नसलेल्या व ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाच्या निवडणुकीत स्व:च्या गावात पराभूत झालेल्या बोगस संघटनेच्या स्वयंघोषित अध्यक्षाने संघटना सरकाऱी नियमानुसार नोंदणी करावी व नंतर कायदेशीर मार्गाने लढा उभारवा ग्रामपंचायत बंद ठेवण्याची भाषा करू नये. आपल्या संघटनेची नोंदणी दाखवावी आणि दोन लाख रुपयाचे बक्षिस जाण्याचे खुले आवाहन सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
गेल्या महिन्यात सरपंच परिषदेची पद्दमश्री पोपटराव पवार, परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव सर्व राज्यकार्यकारणी सदस्य यांची मुंबईत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन याच्यासह बैठक झाली. यामध्ये ग्रामपंचायत, तसेच संगणक चालक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्‍नावर च्रचा झाली. त्यापूर्वी सरपंच परिषदेने सरकारचे लक्ष गावगाड्याच्या मागण्यावर वेधण्यासाठी कराड ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता. सरकारने मंत्री सावे व पाच आमदार यांना पाठवून सातारा येथे 80 किलोमीटरवर हा मोर्चा आल्यावर सरकारच्या वतीने प्रश्‍न सोडविन्याचे आश्‍वासन दिले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ग्रामविकासचे प्रधान सचिव यांच्या सोबत सह्याद्री अतिथीगृह येथे दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वात बैठक होऊन गावगाड्याच्या प्रश्‍नावर सरकार दरबारी कार्यवाही सुरु असताना बोगस असणाऱ्या व गाव पातळीवर काम नसणाऱ्या संघटनेने ग्रामपंचायत बंद ची हाक दिल्याच्या बातम्या प्रसिध्द झाले आहेत. सोशल मीडियावर या बातम्या टाकून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सरपंच परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles