Saturday, February 15, 2025

सरपंच, उपसरपंच ACBच्या जाळ्यात,’या’ कामासाठी मागितलेली ३० हजारांची लाच

कंत्राटदाराकडून ३० हजारांची लाच स्वीकारताना सोग्रस येथील सरपंच, उपसरपंचास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.चांदवड : तालुक्यातील सोग्रस येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण करून बिल काढण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना सोग्रस येथील सरपंच व उपसरपंचास रंगेहाथ पकडण्यात आले.
५० हजार रुपयांची मागणी ठेकेदाराने सोग्रस येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, त्याचे बिल बाकी होते. उर्वरित बिल काढण्यासाठी सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (वय ५५) व उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (वय ४५, दोघे रा. सोग्रस) यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती ३० हजार रुपये मान्य करून शुक्रवारी (दि २९) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांसमोर स्वीकारले म्हणून वडनेरभैरव पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अपअधीक्षक अनिल बडगुजर, नाईक दीपक पवार, शिपाई संजय ठाकरे, नरेंद्र पवार यांच्या पथकाने केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles