Sunday, December 8, 2024

महाराष्ट्रात भाजप महायुतीला लोकसभेच्या 48 तर विधानसभेला 288 जागा मिळतील, विरोधकांच्या हाती भोपळा ..

‘आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात २८८ आमदार आणि लोकसभा निवडणुकीत ४८ खासदार भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून निवडून आणणार आहोत,’ असा दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या टिफीन बैठकीत खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, सुरभी भोसले, सुनील काटकर, काका धुमाळ आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आदींना मी तलवार आणि वाघनखं भेट दिले आहेत. कारण शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानेच स्वराज्य उभे केले आहे. या पद्धतीने आपले सरकार उभे राहिले पाहिजे. यासाठीच मी त्यांना भेटलो आहे.’

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles