सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला. त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. खासगी व्यक्तीमार्फत 5 लाखांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. याप्रकरणाने न्यायालयीन व्यवस्थेत एकच खळबळ उडाली आहे.
सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासमोर एका फसवणूक प्रकरणात सुनावणी सुरू होती. या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर करण्यासाठी त्यांनी खासगी व्यक्तीमार्फत पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांचावर ठपका ठेवण्यात आला. न्यायाधीश निकम यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोपा तक्रारकर्त्या तरुणीने केला आहे.