Sunday, July 21, 2024

लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? म्युझियमने पाठवलेल्या पत्रामुळे वादंग..

लंडन इथल्या म्युझियमने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात ही वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं म्हटल आहे. मग महाराष्ट्र सरकार ही वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचं खोटा दावा का करतेय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान खरी वाघ नख ही साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याचा पुरावा नाही याबाबतची अधिकची माहिती उदयनराजे महाराज स्वतः देऊ शकतील. त्यांनी याबाबत पुढे येऊन बोलावं असेही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.

व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमने असे सांगितले असताना महाराष्ट्राचे मंत्री धादंत खोटे बोलत आहे. जी गोष्टी छत्रपती महाराजांची नाही ती गोष्ट महाराजांची आहे असे सांगत, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. 30 कोटींचा खर्च करत फक्त तीन वर्षासाठी असणार आहे.तसेच वाघनखांसाठी जे संग्रहालय तयार करण्यात येत आहे, त्यासाठी आठ कोटी खर्च करण्यात येत आहे. त्याचे टेंडर देखील महाराष्ट्राबाहेरील कंपनीला देण्यात आले आहे. ही महाराष्ट्राची फसवणूक असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles