अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने समीकरणे तयार झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यावी लागत आहे. त्यामुळे या सरकारचे हायकमांड दिल्लीत असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी वेगळच विधान करून सर्वांना धक्का दिला आहे. भाजपा सातारा लोकसभा मतदारसंघाच्या वतीने टिफीन बैठकीचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. राज्यातील शिंदे सरकारचा हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. कधी कोणाला सोबत घ्यायचं आणि कधी सोडायचं हे फडणवीस यांना चांगलंच समजतं. यामुळे समजनेवाले को इशारा काफी होता है, असं सूचक विधान जयकुमार गोरे यांनी केले आहे.
भाजप आमदार म्हणतात…शिंदे सरकारचे ‘हायकमांड’ हे देवेंद्र फडणवीसच आहेत…
- Advertisement -