Monday, December 9, 2024

अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर…

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का देत अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर आता पुन्हा एकदा काँग्रेसला राज्यात मोठा धक्का लागणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

लवकरच सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र तो नेता कोण आहे याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केला नाही.

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेस हायकमांडचा देखील त्यांच्यावर विश्वास आहे. पक्षातील काही महत्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांचं नाव येतो. यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles