सगळेच पोलिस भ्रष्ट नसतात…आ.सत्यजित तांबे यांनी शेअर केला पोलिसाचा तो व्हिडिओ
पोलिसांना अनेकदा कर्तव्य बजावताना तहान भूक बाजूला ठेवावी लागते. उन, वारा, पावसाची तमा न बाळगता पोलिस डयुटी करीत असतात. अशाच एका पोलिसाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. नाशिक पोलिसांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आ.सत्यजित तांबे यांनी शेअर करीत सगळेच पोलिस भ्रष्ट नसतात, असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये भररस्त्यात बंदोबस्तास असलेला एक पोलिस गाडीवरच जेवणाचा डबा उघडून उभ्यानेच दोन घास खाताना दिसून येत आहे. ड्युटीवर असताना पोटात दोन घास जावे यासाठीही पोलिसांना किती सहन करावे लागते हेच या व्हिडिओतून समोर येत आहे.