Sunday, July 21, 2024

नाशिक विधानपरिषद निवडणूक….आमच्यासाठी तांबेचा विषय क्लोझ !

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नाशिक दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी सत्यजित तांबे यांच्यासह सुधीर तांबे यांच्यावर हल्लाबोल करत एबी फॉर्म देऊनही कॉंग्रेसची उमेदवारी का नाकारली असा सवाल उपस्थित केला असून त्यावर तांबे का बोलत नाही असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्रात मविआ म्हणून काम सुरू आहे. भाजपच्या विरोधातला आमचा जाहीर समझोता

डॉ. तांबे यांच्याशी बोलणं झालं तेव्हा तरी त्यांनी सांगायला हवं होतं, मग असे खोटे आरोप कशाला करता ? आम्ही प्रामाणिक असताना अप्रामाणिक लोकांनी आमच्यावर आरोप करण चांगलं नाही.

देशातली आणि जगातली सर्वात मोठी पार्टी म्हणवणाऱ्या भाजपला नाशिकमध्ये उमेदवार का नाही ? आम्ही जेव्हा तांबे यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा भाजपने उमेदवार का दिला नाही आमच्यासाठी तांबेचा विषय क्लोझ झाला आहे, एकदा पुढे गेलो, आता वापस यायचं काम नाही, वडिलांना तिकीट मिळालं तर पोराने बंडखोरी केली, पोराचा फॉर्म भरायला कोण गेलं ? मग हा घरातला वाद ना ! घरातला वाद काँग्रेसवर का लादता तुम्ही असाही घणाघात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles