वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरील कारवाई नंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना वारंवार बोलून दाखविली आहे. भाजपकडून मुंडे यांना योग्य न्याय मिळत नसल्याची खंत त्यांचे राज्यभरातील समर्थकही व्यक्त करतात. यापार्श्वभूमीवर 24 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सावरगाव येथे होणाऱ्या या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. टिझर व्हिडिओच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे निमंत्रण समर्थकांना दिले आहे.