सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकता.
ही पदभरती लिपिक पदासाठी करण्यात आली आहे. यासाठी उमेदवाराने SBI ची अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. तसेच या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. अर्ज प्रक्रिया कशी असेल, अर्ज कसा कराल हे जाणून घेऊया.
1. शिक्षण मर्यादा
ज्युनिअर असोसिएट्सच्या पदांवर भरतीसाठी घेतलेल्या लिपिक परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराचे किमान शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर असायला हवे.
2. वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षाच्या दरम्यान असायला हवे.
3. अर्ज फी
या भरतीसाठी उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी ७५० रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यात सूट देण्यात आली आहे.
4. निवड प्रक्रिया कशी असेल?
या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया विविध टप्प्यात होणाऱ्या परीक्षेवर आधारित असू शकते. या अंतर्गत जानेवारी, २०२४ मध्ये लिखीत स्वरुपातील परीक्षा
होऊ शकते. तर मुख्य परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात होईल. अधिक माहितीसाठी अधिकृत साइटला भेट द्या.
5. अर्जाची शेवटची तारीख
अर्ज करण्याची तारीख – १७ नोव्हेंबर, २०२३
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ७ डिसेंबर, २०२३