स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. १,५११ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सध्या अजून एक भरती सुरु आहे. असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
स्टेट बँकेच्या असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम्स) (JMGS) पदासाठी ७९७ जागा रिक्त आहेत. त्यातील काही जागा या राखीव प्रवर्गासाठ आरक्षित आहेत. या नोकरीसाठी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर सायन्स अँड / सॉफ्टवेअर इंजिनियरिंग / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग) पदवीप्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे. मुंबई आणि नवी मुंबई येथील ऑफिसमध्ये ही भरती केली जाणार आहे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे.
या नोकरीसाठी ऑनलाइन परिक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे, पणजी येथे परीक्षा केंद्र असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने https://bank.sbi/web/career/Current-Openings या वेबसाइटवर जाऊन नाव रजिस्टर करावे. या नोकरीसाठी अर्ज भरताना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.