विद्यार्थ्यांची तंदुरुस्ती आणि मानसिक विकासाला प्राधान्य देण्यासाठी, चीनमधील काही शाळांनी पारंपारिक वर्गामध्ये एक सकारात्मक बदर केला आहे. चिनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना झोपता यावे यासाठी खास ‘डेस्क’ तयार केले आहे जे काही मिनिटांत बेडमध्ये रूपांतरित होतात. ‘डेस्क’ने शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये नव्याने भर टाकली आहेत, ज्यामुळे मुलांना ठरवून दिलेल्या विश्रांती कालावधीत झोप घेता येते. हे ‘डेस्क’ फोल्ड करण्यायोग्य आहेत.
मुलांच्या बौद्धिक वाढीस आणि एकूणच मानसिक आरोग्यास समर्थन देण्यासाठी विश्रांतीचे महत्त्व ओळखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “चीनमध्ये शिक्षणाकडे अधिक सर्वांगीन दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे याबाबत जागरूकता वाढत आहे. आणि, हा उपक्रम शिकण्याच्या प्रक्रियेवर बदल दर्शवितो, शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे शैक्षणिक यशाशी जोडलेले आहे यावर जोर दिला जात आहे.”