Tuesday, June 25, 2024

भर वर्गात शिक्षकांमध्येच तुंबळ हाणामारी, दोन शिक्षकांच्या हाणामारीचा व्हिडिओ

शाळेमध्ये मस्तीखोर विद्यार्थी शिक्षक वर्गात नसले की एकमेकांना भिडतात. मस्ती आणि हाणामाऱ्या करतात. विद्यार्थ्यांच्या अशा हाणामाऱ्या तुम्ही स्वत: देखील अनेकदा पाहिल्या असतील. विद्यार्थ्यांचा प्रताप शिक्षकांना समजला की त्यांची काही खैर नसते. शिक्षक विद्यार्थ्यांना चांगलाच चोप देतात. अशात आता थेट दोन शिक्षकांनीच विद्यार्थ्यांसारखं कृत्य केलं आहे.

शाळेत शिकवणाऱ्या दोन शिक्षकांनी वर्गातच एकमेकांची कॉलर पकडलीये. दोघांनी एकमेकांना चापटी आणि जोरजोरात बुक्क्या मारल्या आहेत. शिक्षकांची ही हाणामारी सुरू असताना वर्गातील अन्य शिक्षकांनी त्यांचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दिंडोरीत ही घटना घडलीये. दिंडोरीतल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ मध्ये २ महिन्यांपूर्वी नवनियुक्त केंद्रप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीदरम्यान पूर्ववैमनस्यातून दोन शिक्षकांमध्ये शाब्दीक चकमकीनंतर तुंबळ हाणामारी झाली. केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांसमोरच दोन शिक्षकांमध्ये ही हाणामारी झाली आहे.

https://x.com/Ruchika66964659/status/1793900430420054234?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1793900430420054234%7Ctwgr%5E4ec8eea71b76e76c67e109729369d23342bc9bb1%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmaharashtra%2Fzilla-parishad-school-sir-fighting-in-classroom-video-goes-viral-dindori-nashik-rsj99

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles