राज्यातील शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक
शाळेचा कारभार होणार सुरळीत
शाळेची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार
राज्यामध्ये 150 विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं. परंतु महायुती सरकारनं आता 100 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल. यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल .शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल. मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील.. शाळांतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल .यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल.
शाळांच्या विकासासाठी महायुती सरकारचा निर्णय