एका जुगाडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जुगाड करून बनवलेली गाडी दिसत आहे. पाहताक्षणी ही एक स्कॉर्पिओ कार असल्याचे वाटते पण ती एक रिक्षा असल्याचे लक्षात येते. या जुगाडू गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना हा जुगाड खूप आवडला आहे.
किचनसाठी ‘जादूची पोटली’; तांदळाच्या डब्यात नक्की टाका आणि पाहा चमत्कार Video
मनीष त्यागी नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये एक विचित्र तीन चाकांची गाडी दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती या वाहनाचा मागील भाग साफ करताना दिसत आहे. ही गाडी मागून स्कॉर्पिओ सारखी दिसते, पण कॅमेराचा अँगल फिरवताच ती कारऐवजी एक ऑटो उभी असलेली दिसते. मागून पाहिले तर स्कॉर्पिओ लूक असलेली ही एक ऑटोरिक्षा आहे.