२६ ऑगस्ट रोजी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.
त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. अखेर काल रात्री जयदीप आपटेला कल्याणमधून ताब्यात घेण्यात आले आहे. कल्याणमध्ये त्याच्या राहत्या घरापासून जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट गडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी काही दिवसापासून फरार शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याणच्या डीसीपींच्या पथकाने ताब्यात घेतले. जयदीपला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला जयदीप आपटे अखेर राहत्या घरीच सापडल्याची माहिती समोर आली आहे.
जयदीप आपटे आज रात्रीच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येणार असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. सचिन गुंजाळ यांनी सचिन आपटे याला अटक करण्यासाठी दोन पथक तयार केले. एक पथक कल्याण रेल्वे स्थानकात होतं तर दुसरे पथक आपटे याचा बिल्डिंग समोर तैनात करण्यात आले होते. आपटे इमारतीच्या परिसरात येताच रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला डीसीपी ऑफिस मध्ये आणण्यात आले. त्या ठिकाणी त्याची चौकशी डीसीपी सचिन गुंजाळ यांनी केली. नंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.