Monday, June 17, 2024

प्रवरा नदीत शोधकार्य सुरू असताना एसडीआरएफची बोट उलटून तिघांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. प्रवरा नदीत काल दोन तरुण बुडाले असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. या शोधकार्यादरम्यान एसडीआरएफची बोट उलटली आणि तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रवरा नदी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उकाड्याने त्रस्त झालेले अनेकजन या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जात आहेत. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगाव मधील रोपवाटीके जवळील पात्रात दोन युवक पोहण्यासाठी प्रवरा नदीत उतरले होते. यावेळी पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने पोपट जेडगुले (वय २५), अर्जून रामदास जेडगुले (वय १८) या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles